dr.satish best web design developer for mac

इदरगुच्ची ग्रामपंचायत :

गडहिंग्लज तालुक्यापासून 25 कि. मी. अंतरावर वसलेलं इदरगुच्ची हे माझं गाव. सुंदर व सुसज्ज असे आमचं गाव. गावाच्या शेजारी कडलगे, बसर्गे, हलकर्णी, चंदनकुड ही गावे आहेत. ग्रामपंचायती तर्फे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गावामध्ये विहिरी खणल्या आहेत. हे पाणी नळ कनेक्शनव्दारे गावामध्ये पुरविण्यात आले आहे. या पाण्याचे वितरण करण्यासाठी गावामध्ये ग्रामपंचायती मार्फत कामगार नियुक्त केले आहेत. गावात स्वच्छता राखण्यासाठी कचरा कुंडी बसवीलेल्या आहेत. गावातील लोकानी निर्मल ग्रामसाठी चांगले सहकार्य केले आहे. गावातील जेष्ठ नागरीक, पदाधीकारी, पंचायत समीतीचे अधिकारी तसेच ग्रामसेवक यानी निर्मल ग्रामसाठी पुढाकार घेतला आहे. गावामध्ये अंतर्गत रस्ते पक्के आहेत. गाव तंटामुक्त आहे. तसेच अंतर्गत गटारी बांधकाम चांगल्या पध्द्तीने केलेली आहे. गावात रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी स्ट्रेट लाईट बसविण्यात आले आहेत. गावातील बहुतांश लोक शेती करतात पाण्याचे अन्य साधन उपलब्ध नसल्याने शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते त्यामुळे जिरायती पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना 1961 साली झाली. गावची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर सहा सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे. गावामध्ये पर्यावरण संतुलित ग्राम योजनेमधून वृक्षलागवड केली गेली आहे.

सरपंच
सौ. जनाबाई शंकर रेमसी

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
सौ. जनाबाई शंकर रेमसी

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. गौरख बंडू डहाळे

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

FOLLOW US

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Edarguchchi Grampanchayat
A - Edarguchchi, P - Kadalage Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416506

CONTACTS
Phone :

Office : 02327 – 233770